दिल्लीत भाजप खासदाराच्या वडिलांची कार चोरीला, सामान्य जनता विचारतेय प्रश्न

527

टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज व भाजप व खासदार असलेल्या गौतम गंभीर यांच्या वडिलांची कार घराबाहेर चोरीला गेली आहे. खासदाराच्या घराबाहेरूनच कार चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. जर खासदारांच्याच गाड्या सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने काय करावे असे सवाल जनतेकडून केले जात आहेत.

gambhir-bjpगौतम गंभीर यांचे दिल्लीतील राजेंद्र नगर येथे घर आहे. त्या घरात गौतम गंभीर त्यांचे पालक व पत्नी मुलीसह राहतो. गौतम यांचे वडिल दीपक गंभीर यांची टोयोटो फॉर्च्युनर ही गाडी आहे. गुरुवारी रात्री साडे तीनच्या सुमारास त्यांची ही गाडी चोरट्यांनी घराबाहेरून चोरली आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या