राजस्थान-छत्तीसगडमध्ये आम्ही हरणार हे माहीत होतं; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

22

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश तीन राज्यांमध्ये जवळजवळ 65 खासदार आहेत. त्यापैकी काँग्रेसचे तीन खासदार आहेत आणि आमचे 62 खासदार आहेत. असे राज्य जर आमच्या हातून निसटत असेल तर नक्कीच ही धोक्याची घंटा आहे, अशा शब्दात भाजपचे राज्यसभेवर असलेले खासदार संजय काकडे यांनी घराचा आहेर दिला आहे.

गुजरातमध्ये भाजप हरणार, असं भाकित करण्याऱ्या आणि आपल्या सर्व्हेंमुळे कायम चर्चेत राहणारे भाजपचे राज्यसभेवर असलेले खासदार संजय काकडे यांचा हा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये भाजपची अवस्था किती बिकट आहे ते त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात मांडले आहे.

छत्तीसगड, राजस्थानमध्ये आम्ही निगेटीव्ह जाऊ हे मला माहीत होतं. पण मध्यप्रदेशमध्ये मोदी-अमित शहा, अधिक तिथले मुख्यमंत्री, संघ परिवार आणि भाजपची ताकद पाहाता तिथे जर का निगेटीव्ह जातो आहे तर नक्कीच विचार करणं गरजेचं आहे, असं संजय काकडे म्हणाले. 2014 मध्ये मोदीसाहेबांचा जो विकासाचा नारा होता परत घेतला पाहिजे. जातीय राजकारण, मंदिर-मस्जिद, नामकरण, पुतळे हे सर्व मोदींचा 2014 चा जो अजेंडा होता विकासाचा होता पुन्हा घेतला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या