… तर पोलिसांच्या गाड्या जाळू, भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

713

‘तृणमूल काँग्रेस व भाजपच्या हाणामारीत पोलिसांनी मध्यस्थी केली व तृणमूलची बाजू घेतली तर आम्ही त्यांच्या गाड्या जाळू’, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार सौमित्र खान यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होऊ शकतो.

सौमित्र खान हे पश्चिम बंगालमधील विष्णूपूर मतदार संघाचे खासदार आहेत. याआधी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांना ममता बॅनर्जी यांचे कुत्रे असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मंगळवारी देखील त्यांनी तृणमूल काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘जर माझ्या मतदारसंघात तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला तर आम्ही त्यांना काळे निळे होई पर्यंत मारू. माराताना पोलिसांनी त्यात मध्यस्थी केली व तृणमूलची बाजू घेतली तर आम्ही त्यांच्या गाड्या जाळू’, अशी धमकी खान यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या