आदिवासी महिलांचे शोषण करणाऱ्या मुस्लिम तरुणांचे डोके उडवू! – भाजप खासदार

सामना ऑनलाईन । अदिलाबाद

आदिवासी जिल्ह्यांमध्ये मुसलमान तरुण आदिवासी महिलांचे शोषण करत असून ते आम्ही सहन करणार आहे. आदिवासी महिलांचे शोषण करणाऱ्या मुस्लिम तरुणांचे डोके उडवू अशी धमकी तेलंगणाच्या अदिलाबाद येथील भाजप खासदार सोयम बापू राव यांनी दिली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अल्पसंख्यांकांचे नेते साजिद खान यांनी भाजप खासदार सोयम बापू राव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोयम बापू राव यांचेय वक्तव्य चुकीचे असून याविरोधात एसीपी कंचा मोहन यांच्या समोर तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती साजिद खान यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ, सबका विकासच्या बाता करतात परंतु त्यांचेच खासदार वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचे टीआरएस नेते एम. कृषंक म्हणाले.