ओ पाजी! सनी देओलची खासदारकी धोक्यात?

27

सामना ऑनलाईन । गुरदासपूर

प्रसिद्ध अभिनेते व गुरुदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांची खासदारकी धोक्यात आली आहे. सनी देओल यांनी निवडणुकीत प्रचारासाठी अतिरिक्त खर्च केल्याचे समोर आले असून त्याप्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाकडून लवकरच नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते. तसेच ते या प्रकरणात दोषी ठरले तर त्यांची खासदारकी देखील रद्द होऊ शकते असे बोलले जात आहे.

सनी देओल यांना भाजपने पंजाबमधील गुरुदासपूर येथून तिकीट दिले होते. निवडणूक आयोगाने प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला 70 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आखून दिली होती. मात्र सनी देओल यांनी प्रचारासाठी 86 लाख रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार आल्या आहेत. सध्या निवडणूक आयोग सनी देओल यांच्या खर्चाचा हिशेब तपासत आहे. जर या प्रकरणात ते दोषी ठरले तर त्यांना निलंबित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचे समजतते.

आपली प्रतिक्रिया द्या