भाजपचं कार्यालय महापालिकेकडून सील, कर न भरल्यानं कारवाई

सामना प्रतिनिधी । नगर

महानगर पालिकेने मालमत्ताधारकांना आवाहन करून देखील वेळेत पैसे न भरल्यामुळे नगर महापालितकेकडून जप्ती मोहीम हाती घेण्यात आले आहे. गंभीर बाब म्हणजे नगर शहरातील भाजपाच्या जिल्हा कार्यालयावर मोठी थकबाकी आहे. या थकबाकीपोटी महापालिकेने थेट कारावाई तर या कार्यालयाल सील ठोकले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व पथकाने ही कारवाई केली आहे. यामुळे खासदार दिलीप गांधी यांना मोठा धक्का बसला आहे.

नगर महापालिकेचे आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने शहरांमध्ये कर न भरणाऱ्या आणि मोठी थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आले होती. त्यामुळे महापालिकेने सध्या थकबाकीदारांना जोरदार दणका देण्यास सुरुवात केली आहे. शहरांमध्ये असलेल्या भाजपाच्या कार्यालयाकडे दोन लाख ४४ हजार रुपयांची थकबाकी असल्यामुळे नोटीस बजावून देखील सुद्धा पैसे न भरल्यामुळे आज सकाळी महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे. शहराचे प्रभाग अधिकारी प्रजल नायर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.