ईशान्येकडील विजयानंतर भाजपचे दक्षिणेकडे लक्ष

18

सामना प्रतिनिधी । नागपूर

ईशान्येकडील राज्यांमध्ये विजयानंतर भाजपने दक्षिणेकडील राज्यांकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दक्षिणेकडील राज्यामध्ये सत्तेपासून कायमच लांब राहिलेल्या भाजपने आगामी कर्नाटक निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. ईशान्यकेडील त्रिपुरा आणि नागालँडप्रमाणे दक्षिणेतील कर्नाटकातही विजय मिळवू असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांनी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

रविवारी दुपारी अमित शहा यांचे दिल्लीहून नागपुरात आगमन झाले. यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी रामनगरातील भक्ती बंगल्यात जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांनी एकत्र भोजनही घेतले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी निघताना शहा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्रिपुरा व नागालॅंडमधील विजय मिळविला आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी काही नवीन व्यूहरचना आहे काय? असा सवाल केला असता कर्नाटकातही विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाकडे रवाना झाले.

आपली प्रतिक्रिया द्या