सत्तेत आल्यास बंगालमध्ये कोरोनाची लस मोफत, भाजपचे वचन

पश्चिम बंगालमध्ये अजून दोन टप्प्यांसाठी मतदान बाकी आहे. त्यापूर्वी भाजपने बंगाली जनतेला मोफत कोरोना प्रतिबंधक लसीचे वचन दिले आहे.

पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत निवडणूक आहे. त्यापैकी पाच टप्प्यांती मतदान झाले असून दोन टप्प्यांसाठी मतदान बाकी आहे. भाजपने बंगाली मतदारांना मोफत लस देण्याचे वचन दिले आहे. बंगाल भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा करण्यात आली आहे.


बंगालमध्ये भाजप सत्तेत आल्यास नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल असे वचन भाजपने दिले आहे. या पूर्वी बिहार निवडणुकीतही भाजपने मोफत लसीचे आश्वासन दिले होते. तेव्हा विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तेव्हा निवडणूक आयोगाने मोफत लसीचे आश्वासन चुकीचे नसल्याचा निर्वाळा दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या