‘यूपी’त सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा ‘राम नाम जप’, सत्ता आल्यास मंदिराचे वचन

सामना ऑनलाईन । लखनौ

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली उत्तर प्रदेशात सत्ता आणण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. त्यामुळे इतके दिवस केवळ विकासासाठी मत मागण्याचा दावा करणाऱ्या भाजपने आता पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा देत उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास अयोध्येत भव्य मंदिर उभारण्याचं वचन दिल्याची माहिती पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ११ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा आहे समाजवादी पक्षाची. यामुळे भाजपचे नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक हे मुद्दे देखील प्रभावी ठरत नसल्याचे उत्तर प्रदेशातील नेत्यांना वाटू लागल्याने आता पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा समोर ठेवण्याचा भाजपच्या नेत्यांचा विचार आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास अयोध्येत भव्य मंदिर उभारू असे वचन भाजपकडून देण्यात असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.