राजीव गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी, भाजप नेत्याविरोधात तक्रार दाखल

1361

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याने छत्तीसगड येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते तजिंदर पाल सिंग बग्गा यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, तजिंदर बग्गा यांनी ट्विटरवर राजीव गांधी यांच्या विरोधात ट्वीट टाकायला सुरुवात केली. त्यात काही आक्षेपार्ह आरोप करण्यात आले होते. त्यावर कांकेर जिल्ह्याचे यूथ काँग्रेस अध्यक्ष पंकज वाधवानी यांनी बग्गा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच त्यांनी भाजपच्या संस्कार नसलेल्या नेत्यांच्या अपमानजनक टिप्पणी सहन केल्या जाणार नाहीत, असंही म्हटलं आहे. त्यावरही बग्गा यांनी प्रत्युत्तर दिलं.

बग्गा यांच्या ट्वीट्सच्या उत्तर-प्रत्युत्तरात भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही उडी मारली आणि ट्वीट करायला सुरुवात केली. याआधीच संबित पात्रा यांच्या विरोधातही रायपूर येथे आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पात्रा यांनी 10 मे रोजी ट्वीट करून माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्यावर आरोप केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या