श्रीगोंदा नगरपालिका भाजपकडे, पण नगराध्यक्षपद काँग्रेसकडे

56
shrigonda-bjp-congress

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

श्रीगोंदा नगरपालिकेसाठी आज मतमोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण 19 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला केवळ अवघ्या 8 जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र 11 जागांवर जिंकणाऱ्या भाजपचे उमेदवार जिंकले असले तरी नगराध्यक्षपदावर मात्र काँग्रेसने बाजी मारली आहे.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या शुभांगी पोटे दावेदार मानल्या जात होत्या. अपेक्ष प्रमाणेच त्या जिंकून आल्या. शुभांगी पोटे यांनी भाजपाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा 2100 मतांनी पराभव केला.

आपली प्रतिक्रिया द्या