भाजप कार्यकर्त्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांकडून अटक

rape
प्रातिनिधिक फोटो

तमिळनाडूमध्ये एका भाजप कार्यकर्ता आणि पोलीस अधिकार्‍याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. चेन्नईमध्ये एक 13 वर्षाच्या मुलगी आपल्या आईसोबत राहत होते. तिच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. आईला हातभार लागावा म्हणून मुलीने शाळा सोडून छोटी मोठी कामे करण्यास सुरूवात केली होती.

नंतर मुलीच्या आईने तिला एका नातेवाईकांकडे पाठवले. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी तिला वेश्याव्यवसायात करण्यास प्रवृत्त केले. तेव्हा भाजप कार्यकर्ता आणि पोलीस अधिकारी सी. पुगाझेंडी आणि त्याचा मित्र जी राजेंद्र यांनी मिळून भाजप कार्यालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

नंतर पीडित मुलीने आपल्या आईला झालेली घटना सांगितली. आईने पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांसह सी. पुगाझेंडी आणि सह आरोपी जी राजेंद्रन यांना अटक केली. आरोपी भाजप कार्यकर्ते आणि त्याच्या मित्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्या आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या