भाजपा युवा मोर्चाच्या शहर अध्यक्षाविरुध्द सावकारकीचा गुन्हा दाखल

पंढरपूरच भाजप युवा मोर्चाचा शहराध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव (रा.संतपेठ, पंढरपूर) याच्याविरुध्द अवैध सावकारकी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधटराव याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला असता या छाप्यात 48 चेक, सावकारकीचे हिशोब लिहिलेल्या 9 वहया, कोरे स्टॅम्प, चेकबुके, बॅक पासबुके यासह रोख रक्कम 29 हजार 340 रूपये पोलिसांना आढळून आले आहेत.

विदूल अधटराव याच्याविरुध्द खाजगी सावकाराची तक्रारी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केली. या तपासणी प्रदिप भानुदास सावंत (सहकार अधिकारी श्रेणी-1 रा.सहा. निबधंक सहकारी संस्था) यांच्या समक्ष पोलिसांनी दस्तऐवजासह रोख रक्कम जप्त केली आहे. त्याच्याकडून आणखीन असेच प्रकारचे अवैध सावकारकीचे प्रकार घडले असण्याची अथवा घडत असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नागरिकांना पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन केले आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाणे गु.र.नं. 135/2021 महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम 2014 चे कलम 30,45 सह भा.दं.वि.कलम 506 प्रमाणे अधटराव याच्यावर दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोलीस कर्मचारी गोविंद कामतकर, सुनील पवार, निता डोकडे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या