बीकेसीमध्येच इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर होणार

13
Maharashtra chief minister Devendra Fadnavis

सामना ऑनलाईन । नागपूर

मुंबईतील बीकेसीमध्येच इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर करण्यात येईल. बुलेट ट्रेनसाठी दुसरीकडे कुठेही हे सेंटर स्थलांतर केले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई येथे बुलेट ट्रेन होत असल्यामुळे इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर स्थलांतरित होणार का, असा प्रश्न सदस्य संजय दत्त यांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, बुलेट ट्रेनमुळे फायनान्स सर्व्हिस सेंटरवर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर मुंबईत असणे आवश्यक असल्याचे २००५-०६ मध्ये सांगितले होते. बुलेट ट्रेनसाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्याचा मास्टर प्लॅन तयार केला जात आहे.

बुलेट ट्रेनसाठी फायनान्स सर्व्हिस सेंटरची जागा दिली जाणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट करण्यात आले आहे. बुलेट ट्रेनच्या स्टेशनचा आराखडा तयार करताना चार मजले खाली जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली असून हे सेंटर बांधून देण्याचीही तयारी दर्शवली आहे. स्टेशन करताना इंटरगेट प्लॅन तयार करण्यात आल्याने त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या