काळे चणे खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

निरोगी शरीरासाठी काळ्या चण्याचा आहारात समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे. चणे पौष्टिक आणि लाभदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. कच्चे, उकडून किंवा भाजून खाता येतात. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. जाणून घेऊया काळ्या चण्याचे फायदे.

– मधुमेही रुग्णांसाठी काळे चणे अत्यंत पोषक आहार आहे, काळ्या चण्यांमध्ये फायबरची अधिक मात्रा असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण आणायचे असेल तर काळे चणे आवर्जुन खावे.

– वजन कमी करण्यासाठी काळे चणे फायदेशीर आहेत. यामध्ये कोलेस्ट्रोलची पातळी कमी करण्याचे घटक आहेत. हे चणे कोलेस्ट्रोलची पातळी नियंत्रणात आणून वजन आटोक्यात आणायला मदत करतात. त्यामध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास मदत करते आणि आवश्यक पोषक पूर्ण करते. वजन कमी करण्यासाठी सलाड म्हणून चणे खाऊ शकतो.

– अॅनिमियाचा त्रास असलेल्या लोकांनी चण्याचा आहारात समावेश करावा. चण्यात असलेले लोह हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत करतात. रक्ताची कमतरता दूर होऊन रक्त शुद्ध होते.

– भिजवलेले चण्यांमुळे पाचनक्रिया सुधारते. चण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर प्रामुख्याने अन्न पचवण्यासाठी कार्य करतात. त्यामुळे भिजलेले चणे खाल्ल्याने पचनसंस्था देखील बळकट होते.

– काळ्या चण्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. चणे हे कोणत्याही प्रकारे खाता येतात. कच्चे, उकडून, भाजून, भाजी बनवून किंवा सलाड बनवून चणे खाऊ शकता.

– चण्याची भाजी आवडत नसल्यास त्याचा चाट बनवून खाऊ शकता. त्यासाठी आवश्यक टोमॅटो, कांदे, काकडी, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे बारीक करून घालायचे. चवीनुसार थोडं मीठ आणि इतर मसाले घाला. शेवटी लिंबू पिळून चाटचा आनंद घेऊ शकता.

आपली प्रतिक्रिया द्या