आहारात समाविष्ट करा काळय़ा मनुका, हे आहेत फायदे

black-kishmish

रक्तदाबाचा त्रास असेल तर दररोज काळ्या मनुका खाव्यात. काळ्या मनुक्यांमध्ये पोटॅशियम असल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास कमी राहण्यास मदत होते.

काळ्या मनुकांमध्ये लोह आणि ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे नियमित दुधातून काळ्या मनुकांचे सेवन करावे.
मुरुमांची समस्या असल्यास दुधातून काळ्या मनुका खाव्यात. काळ्या मनुकांमध्ये ऍण्टि-ऑक्सिडेण्ट आणि ऍण्टि-बॅक्टेरियलचे गुणधर्म आहेत. त्याने फायदा होतो.
रक्ताची कमतरता असल्यास नियमित काळ्या मनुका खाव्यात. मनुकांमध्ये असणारे लोह हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते आणि त्यामुळे अशक्तपणा दूर होतो.
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी मनुका एक चांगले टॉनिक आहे.
सकाळी उपाशीपोटी मूठभर काळ्या मनुका खाल्ल्यास रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होते.
वजन कमी करण्यासाठीही काळ्या मनुकांना फायदेशीर मानले जाते. यात असणारे फायबर पोटात गेल्यास बराच वेळ काही खाण्याची गरज वाटत नाही.
हाडांच्या मजबुतीसाठी काळ्या मनुका उपयोगी आहेत. त्यात असणारे कॅल्शियम आपले हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही काळ्या मनुका चांगल्या मानल्या जातात. त्यामध्ये असलेल्या ऍण्टिऑक्सिडेंटमुळे दृष्टिदोष सुधारतो आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
पित्ताचा त्रास असल्यास काळ्या मनुका खाणे गुणकारी ठरते. मनुकांमध्ये असणारे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम घटकामुळे पित्ताचा त्रास होत नाही.
चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी मनुका फायदेशीर आहेत. मनुकांमुळे रक्त शुद्ध राहण्यास मदत होते.

आपली प्रतिक्रिया द्या