हिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे?

जगभरात अनेक आश्चर्यकाराक गोष्टी आहेत. त्याच्यातील अनेकांच्या रहस्यांचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाही. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि अवकाश तंत्रज्ञानामुळे आपण मंगळापर्यंत पोहचलो असतो तरी पृथ्वीवरील अनेक जीवांचे रहस्य उलगडलेले नाही. कोरोनासारख्या विषाणूने थैमान घातल्यानंतर हे सूक्ष्म जीव चिंतेचा विषय ठरले आहेत. आता जागतिक समस्या असलेल्या जागतिक तापमानवाढ या समस्येमागेही सूक्ष्म जीव आहेत का, याची चर्चा सुरू झाली आहे.

वॉशिंग्टनच्या पॅराडाइज ग्लेशिअरमध्ये काळ्या रंगाचे धाग्यासारखे किडे आढळले आहेत. या किड्यांवर अद्यापपर्यंत संशोधन कसे झाले नाही, याकडे वैज्ञानिक संशोधक यांचे लक्ष कसे गेले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे जीवशास्त्रज्ञ स्कॉट हॉटलिंग आणि त्याचे सहकारी पीटर विंबर्गर या किड्यांबाबत अधिक संशोधन करत आहेत. या किड्यांमुळेच हिमनग वितळत आहेत काय, याबाबतही संशोधन करण्यात येत आहे.

काळ्या रंगाचे धाग्यासारखे दिसणारे हे किडे हिमनगात लपलेले असतात. ते 0 अंश तापमानापर्यंत सहज जिवंत राहू शकतात. मात्र, तापमान घसरल्यावर त्यांचा मृत्यू होतो. बॅक्टेरियावर त्यांची गुजराण होते. मात्र, वर्षभर काहाही न खाता ते जिंवत राहू शकतात. मात्र, हे किडे बर्फात कसे आले आणि आता हिमनगांमध्ये त्यांची वाढ कशी होत आहे, असा प्रश्न संशोधकांना पडला आहे.

तापमानवाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग ही जागतिक समस्या बिकट होत असल्याने हिमनग वितळत आहेत. त्यामुळे हिमनगात आढळणाऱ्या या किड्यांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी सांगितले. तसेच मंगळासरख्या ग्रहावरील जीवसृष्टीबाबतचा अंदाज करण्यासाठीही याचा अभ्यासाची मदत होऊ शकणार आहे. वातावरणातील बदलांशी या किड्यांना जुळवून घेता आले नाही तर हे किडे लुप्त होतील, अशी शक्यता स्कॉट यांनी व्यक्त केली आहे.

वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी हे किडे हिमनगातील उष्णता खेचून घेत असावेत, त्यामुळे हिमनग वितळत असावेत, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. गडद रंग असलेल्या ठिकाणचे हिमनग वितळत असल्याने त्याठिकाणी हे किडे असावेत, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत ठोस माहिती नसल्याने याचा अधिक अभ्यास करून हिमनग वितळण्यामागे हे किडे आहेत काय, हे शोधणे महत्त्वाचे असल्याचे स्कॉट यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या