मोबाईलमध्ये बँक डिटेल्स असेल तर तातडीने डिलीट करा, अन्यथा ‘BlackRock’ करेल खिसा रिकामा

3512

जर तुमच्या मोबाईलमध्ये बँक डिटेल्स, पासवर्ड, एटीएम पिन यासारखे इंटरनेट बँकिंगची माहिती सेव्ह असेल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण अँड्रॉइड फोनमध्ये एक नवीन व्हायरस शिरला असून हा व्हायरस बँक डिटेल्सची चोरी करत आहे. या व्हायरसचे नाव BlackRock असून बँक डिटेल्सच्या सहाय्याने हा व्हायरस युजर्सच्या पैशांवर डल्ला मारत आहे.

BlackRock अँड्रॉइड मालवेअर व्हायरसबाबत केंद्र सरकारच्या सायबर विभागाने सर्वांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. हा अँड्रॉइड मालवेअर व्हायरस जवळपास 337 अँड्रॉइड ऍपची माहिती चोरी करण्यास सक्षम आहे. यात जीमेल, अमेझॉन, नेटफ्लिक्स आणि उबेर यासारख्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ऍपचा देखील समावेश आहे.

BlackRock अँड्रॉइड मालवेअर व्हायरसबाबत सर्वात आधी मोबाईल सुरक्षा कंपनी ThreatFabric ने माहिती दिली होती. हा मालवेअर strain Xerxes सोर्स कोडवर आधारित आहे. तुम्ही एखाद्या ऍपवर लॉगइन करताना युझर आयडी, पासवर्ड टाकताना तो रेकॉर्ड करतो. यानंतर हा व्हायरस युझरला एका खोट्या पेजवर लॉगइन करून देतो. याद्वारे तो मोबाईलच्या मेसेज, कॅमेरा, फोटो गॅलरी यासारख्या गोष्टींवर कब्जा करतो. तसेच खोट्या गुगल अपडेट द्वारे देखील तो मोबाईलमध्ये शिरून माहिती चोरतो.

अशी घ्या काळजी
हा BlackRock अँड्रॉइड मालवेअर व्हायरस साधारणपणे अँटी व्हायरसचा चकमा देतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टीद्वारे किंवा सोर्सद्वारे मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करू नका. तसेच थर्ड पार्टी ब्राउझर ऍपचा वापरही करू नका.

आपली प्रतिक्रिया द्या