लंडनमधील भुयारी मेट्रोमध्ये स्फोट

38

सामना ऑनलाईन । लंडन

लंडनच्या टॉवर हिल स्टेशनवरील मेट्रोमध्ये मंगळवारी जोरदार स्फोट झाला. मोबाईलच्या पॉवर बँकचा स्फोट झाल्याने काही काळासाठी गोंधळाचे वातावरण होते. स्फोटानंतर संपूर्ण स्टेशन खाली करण्यात आले आणि मेट्रो आहे त्या ठिकाणी थांबवण्यात आली. स्थानिक मीडियाने स्फोटामध्ये पाच जण जखमी असल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

टॉवर हिलवर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट मोबाईल चार्जर किंवा पॉवर बँक फुटल्याने झाला असे सांगितले. ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला नाही असे म्हटले आहे. घटनास्थळाकडे पोलीस आणि अग्निशमन दलाला रवाना करण्यात आले आहे.

लंडनमध्ये या वर्षी झालेला हा पाचवा स्फोट आहे. याआधी १६ सप्टेंबरला दक्षिण लंडनच्या पार्सन्स ग्रीन रेल्वे स्टेशनमध्ये मेट्रोत स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये २२ लोक जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांन आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या