पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्याजवळ स्फोट; एक जवान जखमी

630

दक्षिण कश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात गंगू सर्क्युलर रोजडवळ सीआरपीएफच्या ताफ्याजवळ दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. दहशतवाद्यांनी घडवलेल्या या स्फोटात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली. सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम राबवण्यात येत आहे. या स्फोटाचा तपास करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. सुरक्षा दलाने ऑपरेशन ऑल आऊटला गती दिल्यामुळे दहशतवादी सुरक्षा दलाला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या