कोची येथे शिपयार्डमध्ये स्फोट, चार ठार ११ जखमी

27
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । कोची

केरळची राजधानी कोची येथे शिपयार्डमध्ये झालेल्या स्फोटात ४ जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अचानक शिपयार्डमध्ये एक मोठा स्फोट झाला. ओएनजीसीच्या ड्रील शिप कंटेनरच्या पाण्याच्या टँकरमध्ये हा स्फोट झाला. त्यावेळी या टँकरच्या सफाईचं काम सुरू होतं. या टँकचं नाव सागर भूषण असं आहे.

या स्फोटानंतर घटनास्थळावर गोंधळ उडाला. स्फोटामुळे चार जण होरपळून मृत्युमुखी पडले तर ११ जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू असून आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या