Medical Astrology – हॉर्मोन्स -थॉयरॉईड आणि कुंडली

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई ( ज्योतिष, वास्तु विशारद)

ज्योतिष शास्त्र म्हणजे फक्त गुण मिलन किंवा ग्रहपीडा इतकेच सीमित नसून त्याचा अभ्यास अफाट आहे. त्याच्या अनेक शाखा आहेत. Mundane Astrology म्हणजे भौगोलिक घडणाऱ्या घटनांवर भाकिते करणे. त्याप्रमाणे Medical Astrology हा सुद्धा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास. ह्या Medical Astrology मध्ये व्यक्तिच्या कुंडलीवरून त्याला असणारी किंवा होणारी शारीरिक पीडा ह्याची कल्पना येऊ शकते. आज ह्या Medical Astrology नुसार कुंडलीवरून ‘थॉयरॉईड’ कसा समजून येऊ शकतो ते पाहूया.

गेल्या दोन ते तीन आठवड्यात माझ्याकडे संतती संदर्भात दोन -तीन केसेस आल्या होत्या. त्यापैकी स्वातीची (नाव बदलेले आहे ) समस्या वेगळी होती. तिच्या शरीरात “Female Hormones” स्त्रवत नसल्याने तिला प्रत्येक महिन्यांत हॉर्मोन्सची इंजेक्शन्स घ्यावी लागत होती. इंजेक्शन्स घेतल्यानंतर त्याचे परिणाम आणि आलेला थकवा ह्यांत पिंजून गेली होती. तिला तिच्या कुंडलीवरून बाळाचे योग कधी आहेत ? काय काळजी घ्यावी ? ह्याबद्दल चर्चा केली. तीन वर्ष सतत हेच सुरू आहे परंतु यश नाहीच. स्वाती खूप नकारात्मक झाली होती. नोकरीची दगदग, नंतर संततीसाठी दर महिन्याला द्याव्या लागणाऱ्या परीक्षेमुळे पार कंटाळून गेली होती. तिला सकारात्मक गोष्टी सांगणे गरजेचे होते. माझ्याकडे आलेल्या काही जोडप्यांच्या समस्या आणि त्या पार करून त्यांना झालेल्या संततीबद्दल तिला सांगितल्यानंतर स्वातीला थोडा हुरूप वाटला.

गेल्या काही ९-१० वर्षात येणाऱ्या जोडप्यांच्या समस्यांपैकी एक म्हणजे ‘संतती’ कधी होणार ? संतती कधी होणार एवढाच प्रश्न नसून होणारी संतती नैसर्गिक पद्धतीने होणार आहे ? की IVF/ IUI पद्धतीने हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. प्रेग्नन्सी राहिल्यानंतरसुद्धा काहींचा समस्यांचा सामना संपलेला नसतो. महत्प्रयासाने त्यांना संतती होते. परवाच आलेल्या मिहीर आणि सुधा (नावे बदलेली आहेत )ह्यापैकींच एक. २०१२ साली जेंव्हा सुधा आणि मिहीर आले होते तेंव्हा त्यांचे नुकतेच लग्न झालेले होते. करिअर,घर ह्यांवर चर्चा झाली आणि मग संतती कधी होणार हा मिहीरचा प्रश्न. सुधाची कुंडली पाहता सुधाच्या कुंडलीत संतती योगाबाबत थोडा त्रास असल्याचे दिसते. तुळेचा गुरु पंचम स्थानात. पंचमेश आहे शुक्र जो कार्येश होतो व्यय स्थानाचा सुद्धा. (व्यय स्थान – त्रास किंवा हानीचे स्थान ) शुक्र स्वतः लाभ स्थानात. म्हणजेच संतती होईल परंतु समस्या पार केल्यानंतर. थॉयरॉईड आहे का ? असं विचारल्यानंतर सुधाचे उत्तर – ‘नाही’ असे होते. कुंडलीत थॉईरॉईडची शक्यता वाटतेय त्यामुळे त्याची तपासणी वेळेत करून घेण्यास सांगितले. pregnancy राहिल्यानंतर ‘पूर्ण आराम असणे’ (मनाला आणि शरीराला ) हे महत्त्वाचे. त्या दिवसानंतर परवा आमची भेट झाली. त्यावेळेस तिने pregnancy राहण्यात किती अडचणी आल्या आणि मग बाळ होईपर्यंत bed rest घ्यावी लागली हे सांगितले. प्रेग्नन्सीत थॉयरॉईड असल्याचे लक्षात आले. २०१५ साली मुलगी झाली. त्यानंतर सुधा २०१७ साली पुन्हा एकदा प्रेग्नन्ट राहिली परंतु दीड महिन्यानंतर ‘Miscarriage’ झाले. थॉईरॉइडमुळे बराच शारीरिक बदल झाला होता. त्यानंतर तिला मी सांगितलेल्या गोष्टींची आठवण झाली. पुन्हा बाळ होईल का ? हा प्रश्न घेऊन दोघे आले होते. कुंडलीतील योग आणि तिचे वय लक्षात घेता आता pregnancy जीवावरही बेतू शकते तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल हे तिला समजावले.

तूळ राशीतील गुरु हा थॉयरॉईड संदर्भात समस्या देतो असं बऱ्याचदा निर्देशनास आले आहे. तूळ राशी ही गर्भाशयाशी निगडीत आहे. ह्या राशीत जेव्हा गुरु असतो तेंव्हा हॉर्मोन्स संबंधी, गर्भाशयाशी किंवा लिव्हरशी निगडीत समस्या असल्याचं observation आहे. थॉईरॉईडच्या काही प्रकार आहेत. त्यापैकी एका प्रकारात व्यक्तिचे वजन वाढत जातं. गुरु हा ग्रह (चरबीचा कारक ग्रह ) वजन वाढण्यास पूरक ठरतो. गुरु पंचम, षष्ठ, अष्टम आणि व्यय स्थानात असल्यास वेळीच थॉईरॉईड तपासून घ्यावा. काही वेळेस प्रेग्नन्सीच्या आधी थॉयरॉईड असल्याचे लक्षात न आल्यास गरोदरपणात तपासणीत ते कळून येते. त्यामुळे असा योग कुंडलीत असेल तर लग्नानंतर प्लॅनिंग शक्यतो न केलेलंच बरं.

थॉयरॉईड ह्या ग्रंथी गळ्याच्या भागात स्थित असतात. कालपुरुषाच्या कुंडलीप्रमाणे गळा हा भाग वृषभ राशीच्या अंमलाखाली आहे. वृषभेचा स्वामी ‘शुक्र’ हार्मोन्सच्या बदलाशी अजून एका ग्रहाचा अभ्यास केला जातो आणि तो म्हणजे चंद्र. ज्योतिष-शास्त्राप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक ग्रह. चंद्र ज्याप्रमाणे कला बदलतो त्याप्रमाणे आपल्या शरीरातील हॉर्मोन्सवरही परिणाम होत असतो. ह्याचा सरळ अर्थ असा की तुम्ही जसा विचार करता तास तुमच्या शरीरावर त्या विचारांचा परिणाम होत असतो. मनात येणारे विचार हे चंद्राशी निगडीत. त्यामुळे नकारात्मक विचार किंवा नोकरीच्या ठिकाणी असलेले स्पर्धात्मक विचार ह्यांमुळे हॉर्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे शुक्र, गुरु आणि चंद्र ह्यांच्या अभ्यासावरून कुंडलीतुन थॉयरॉईड लक्षात येऊ शकतो. थॉईरॉईडच्या इतर प्रकारांमध्ये शनि आणि बुधाचाही अभ्यास अपेक्षित आहे.

थॉयरॉईड ही सध्याची वाढती समस्या. खाण्याच्या, झोपण्याच्या वेळा, नोकरीतील स्ट्रेस, घर हे सांभाळता सांभाळता हॉर्मोन्सवर परिणाम होत असतो. ह्या उपाय म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस वेळेवर घेणे. निदान जेवणाच्या वेळा पाळणे. ८ तास झोप झालीच पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करणे, जेवणाच्या पद्धतीत बदल करणे, चालण्याच्या व्यायाम, योग, मेडिटेशन ह्यामुळे थॉयरॉईड आटोक्यात येऊ शकतो. थॉयरॉईड आटोक्यात आणण्यासाठी ह्या सर्वांबरोबरच सकारत्मक विचारांची गरज आहे. आपल्या विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतोच म्हणूनच Think Positive Live Positive.

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

summary- blog of anupriya desai on medical astrology

आपली प्रतिक्रिया द्या