अशी असावी आपल्या ऑफिसची वास्तू

174

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई ( ज्योतिष, वास्तु विशारद)

प्रतिभाला नुकतीच नवीन नोकरी मिळाली होती. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनी तिला नावाजलेल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर आम्ही तिच्या केबिनमध्ये काय ठेवावे? काय असावे? काय असू नये? ह्यांवर चर्चा केली. तिला काही suggestions दिले. काही दिवसांतच तिने ते अंमलात आणले. वास्तुनुसार बॉसची केबिन कशी असावी हा आजचा विषय.

वास्तुनुसार बॉसची केबिन अशी असावी –
बॉस म्हणजे ज्यांवर कंपनीची सर्वात जास्त जबाबदारी आहे. ह्याच्या नंतर नंबर असतो तो सिनिअर आणि जुनिअर स्टाफचा. ह्या सर्वांकडून काम वेळेत पूर्ण करून घेणे म्हणजे कठीण. त्यामुळे बॉसची केबिन अशी असावी ज्यामुळे त्याला स्वतःला सतत सकारात्मक ऊर्जा मिळत राहावी.

केबिनमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे –
१) बॉसची खुर्ची, टेबल, कॉम्प्युटर, फोन.
२) फाईल्सचे कपाट
३) कॉफी टेबल आणि खुर्च्या

१) केबिनमधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉसची बसण्याची दिशा. हे दिशा अशी असावी ज्याने मनाची चंचलता कमी होऊन स्थिरता लाभेल. दक्षिण ही दिशा Name and Fame ह्याच्याशी निगडीत आहे. तुम्हाला प्रसिद्ध मिळणे,समाजात नाव होणे हे ह्या दिशेवर अवलंबून आहे. बॉसची बसण्याची दिशा दक्षिणेकडे किंवा दक्षिण-पश्चिम असावी जेणेकरून चेहेरा उत्तर अथवा पूर्व दिशेत असेल. दक्षिण पश्चिम अथवा दक्षिण ह्या उत्तम दिशा आहेत. कॉम्प्युटर, फोन आणि तत्सम गोष्टी त्या टेबलवर येतील.

२) रूमचा रंग फार उग्र असू नये. ह्याचे कारण ऑफिसचे वातावरण हे नेहेमीच Tensed असते. मिटींग्स, टार्गेट्स,  रिपोर्टींग वगैरे. त्यामुळे रंग असा असावा ज्यामुळे मनावर ताण येणार नाही. फिक्कट पिवळा, पांढरा, करडा ह्या रंग छटा चालू शकतील.

३) रूममध्ये कुठलेही फर्निचर किंवा कुठलीही गोष्ट तुटक्या अवस्थेत असू नये.

४) सोफा आणि कॉफी टेबल उत्तर दिशेत असल्यास चांगले.

५) प्रोजेक्शन स्क्रीन अथवा टी. व्ही. स्क्रीन असल्यास उत्तर भिंतीला असावा.

६) फाईल्सचे कपाट बॉसच्या टेबलाशेजारीच असावे परंतु दक्षिण अथवा पश्चिम दिशेच्या भिंतीला लागून असावे.

७) खिडकी असल्यास,भिंतीच्या रंगछटेनुसार पडद्याचा रंग असावा. खिडकी पश्चिम दिशेत असल्यास मरून, निळा अथवा जांभळा रंगाचे पडदे असावेत. दक्षिण दिशेत खिडकी असल्यास गडद पिवळ्या रंगाचा जाड कापडाचा पडदा असावा. पूर्व आणि उत्तर दिशेतील खिडक्यांसाठी पिवळ्या, Light Green किंवा Light Orange रंगाचे पडदे असावेत.

८) खोली नेहेमीच Fresh राहावी म्हणून रुम फ्रेशनरचा वापर आणि काही रोपट्यांचा किंवा फुलदाण्यांचाही वापर करावा. दोन -चार रोपांमुळे खोलीला Liveliness येण्यास मदत होईल.

अर्थात हे सर्व साधारण नियम झाले. तुमच्या कुंडलीनुसार आणि तुमच्या हुद्द्यानुसार तुमच्या केबिनमध्ये बदल करतांना वास्तूतज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित ठरेल.

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

summary- blog of anupriya desai on office cabin interior

आपली प्रतिक्रिया द्या