चीन युद्धासाठी सज्ज करतोय रक्ताचा मोठा साठा

20

सामना ऑनालाईन । बीजिंग

हिंदुस्थान आणि चीन यांच्यात डोकलामवरुन वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने सैनिकांसाठी रक्ताचा मोठा तयार करण्यास सुरुवात केली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीन सरकारने युद्धाची तयारीसाठी सीमेजवळच्या रुग्णालयांमध्ये रक्ताचा साठा करायला सुरुवात केली आहे. रुग्णालयांमधून रक्ताच्या वापरावर निर्बंध घालून रक्ताच्या अनेक बाटल्या सैनिकांसाठी रवाना केल्या जात आहेत. अचानक चीनमधील रक्तदान शिबिरांमध्ये वाढ झाली आहे.

चिनी वायुदलाच्या हालचालींमध्ये वाढ

तिबेट आणि आसपासच्या भागातील रुग्णालयांमधून रक्ताचा मोठा साठा केला जात आहे. रक्त दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर केला जात आहे. चीनच्या वायुदलाच्या हालचालींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. लढाऊ विमानांचा ताफा तसेच मालवाहक आणि लढाऊ हेलिकॉप्टरांचा ताफा सीमेजवळच्या विमानतळांवर तैनात करण्यात आला आहे. सीमेजवळच्या भागात लांब पल्ल्यांच्या तोफा, रॉकेट, क्षेपणास्त्र अशा प्रकारचा शस्त्रसाठी सज्ज केला जात आहे.

चीनचे तिबेटजवळ पाच विमानतळ आहेत. यातील एक डोकलामपासून १ हजार किलोमीटर अंतरावर आहे. चीनकडे १२०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारे जे-१०सी आणि जे-११ ही फायटर विमानं आहेत. सध्या या विमानांचा ताफा सीमेजवळच्या विमानतळावर तैनात आहे. चीनच्या या हालचालींमुळे हिंदुस्थान-चीन यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या