उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

74

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या बुधवार, दि. २४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान श्रीहरी पेव्हे लियन, शहानुरमिया दर्गा, संभाजीनगर येथे हे शिबीर होणार आहेत. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडी संपर्क प्रमुख डॉ. मनीषा कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, सुहास दशरथे, त्रंबक तुपे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोंणगावकर उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, संतोष जेजुरकर, आनंद तांदूळवाडीकर, अनिल पोलकर, गणू पांडे, राजेंद्र राठोड, विधानसभा संघटक राजू वैद्य, सुशील खेडकर, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी , विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, सभागृह नेते विकास जैन, गटनेते मकरंद कुलकर्णी, भा. का. से. सरचिटणीस प्रभाकर मते पाटील, तालुकाप्रमुख बाप्पा दळवी, संपर्क संघटक कला ओझा, सह संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, जिल्हा संघटक सुनीता देव, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, जिल्हा युवाधिकारी ऋषिकेश खैरे, संतोष माने यांची उपस्थिती राहणार आहेत. यावेळी सर्व महानगर पालिकेचे सर्व नगरसेवक, अंगीकृत संघटनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या