दक्षिण मुंबईत महारक्तदान शिबीर, 3642 जणांनी केले रक्तदान

71

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 11 च्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 3642 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

या शिबिरात सर जे. जे. रुग्णालय, नायर रुग्णालय, केईएम रुग्णालय, शीव रुग्णालय, प्रबोधनकार ठाकरे रक्तपेढी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय, सेंट जॉर्ज, कामा, जसलोक, मुंबई रुग्णालय आदी 14 रक्तपेढय़ांसाठी रक्त संकलित करण्यात आले आहे. केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अरविंद सावंत, शिवसेना उपनेते-स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, आमदार सुनील शिंदे, उपमहापौर हेमांगी वरळीकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विभाग संघटक किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसैनिक, रक्तदाते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या