शिवसेनेच्या रक्तदान मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

699

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेकडो जण या शिबिरात रक्तदान करीत आहेत.

कांदिवलीत 132 जणांचे रक्तदान
शिवसेना विभाग क्रमांक २ कांदिवली पश्चिम येथे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात १३१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. शाखा क्रमांक २१ चे शाखाप्रमुख श्याम मोरे, महिला शाखाप्रमुख सुषमा कदम, विधानसभा संघटक संतोष राणे, उपविभाग प्रमुख रवींद्र वेदपाठक, अभिषेक शिम यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात आले.

बोरिवलीतही उत्तम प्रतिसाद
शिवसेना विभाग क्र. १ च्या वतीने बोरिवली येथे विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस व शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक गणपती न्यासच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, संजय भोसले, विनोद राजेशिर्के, अमोल बोरकर, विपुल दारूवाले, श्रीराम काटे यांनी परिश्रम घेतले. या शिबिरास विभाग संघटक सुजाता शिंगाडे, प्रभाग समिती अध्यक्षा संध्या दोशी, मागाठाणे विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर, नगरसेवक हर्षद कारकर, उपविभागप्रमुख विनायक सामंत यांनी भेट देऊन रक्तदात्यांना सन्मानित केले.

आपली प्रतिक्रिया द्या