भायखळ्यात आज रक्तदान शिबीर

राणीबागचा विघ्नहर्ता, पालनजी रतनजी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि परळ येथील बीआयटी चाळ क्रमांक-3मधील सहयोगी मित्र मंडळाच्यावतीने मंगळवार 15 ऑगस्टला रक्तदान, नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीर सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत भायखळा येथील दादोजी कोंडदेव मार्गावरील लुणावा भवन येथे होणार आहे. रक्तदात्याला रोटरी क्लब वरळी आणि लोअर परळमधील महावीर इंटरनॅशनल ट्रस्ट यांच्यावतीने भेटवस्तू देण्यात येणार आहे. संपर्क – निखिल जठार – 7977887763, महेश माळी – 9664008300.