रक्त तपासणीसाठी खासगी लॅबमध्ये पाठवल्यास कारवाई,आरोग्य राज्यमंत्र्यांची माहिती

959

नायर रुग्णालयात रक्तातील विविध आजारांचे निदान करण्यासाठी ट्रीव्हीट्रॉन मशिन खरेदी करण्यात आले. सध्या या रुग्णालयात चार मशिन्सच्या सहाय्याने चाचण्या सुरु आहेत. त्यामुळे कोणत्याही वैद्यकीय चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठवल्यास रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

रक्तातील सीबीसी तपासणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयासाठी 2003 व 2009मध्ये जपानमधील कंपनीकडून दोन मशिन्स खरेदी केल्या होत्या; पण या मशीन्स बंद असल्याच्या संदर्भात आमदार अशोक पवार आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 2003-2009 कालावधीत जर्मन कंपनीच्या तीन मशिन रक्त तपासणीसाठी घेण्यात आल्या होत्या. त्यातील एक मशिन मुदतीपूर्व बंद पडल्याने कंपनीकडून ही मशिन बदलून नवीन मशिन घेण्यात आल्याचे सांगितले.

महापालिका रुग्णालयात नवीन तंत्रज्ञान आणा – सुनील प्रभू
2018 साली हे बंद पडलेलं मशीन सतत बंद पडतं. 2016 पासून एवढा वेळ का लागला. कंपन्यांनी वॉरंटी पिरीयड बदलून देऊ असं सांगितलं होतं. त्यामुळे जर हे मशीन बंद पडले तर यासाठी टेंडर फ्लोट करताना टेक्निकल ऍडव्हायझरी कमिटी असते. या ऍडव्हायजरी कमिटीवर आरोग्य संचालकांसह अन्य सदस्य असतात त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला. त्याचप्रमाणे आज मितीला 150 ते 200 ही वाढत्या संख्येने सीबीसी चाचणी होते. तेव्हा ही गरज पूर्ण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणावे, अशी सूचना सुनील प्रभू यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या