अबब..! 276 किलोंचा मासा, किंमत 12 कोटी 91 लाख

जपानमध्ये एका टुना माशाला (bluefin tuna) लिलावामध्ये विक्रमी किंमत मिळाली आहे. ही किंमत ऐकाल तर वेडे व्हाल… हजारो, लाखो रुपये नव्हे तर कोट्यवधी रुपये खर्च करून या माशाला खरेदी करण्यात आले आहे. जपानमधल्या सुशी रेस्टॉरंट चेनच्या मालकाने टोकियोमधील माशांच्या बाजारपेठेतून तब्बल 1.8 मिलियन अर्थात 12 कोटी 91 लाख 69 हजार 800 रुपये मोजून टुना मासा विक्रम घेतला आहे. या माशाचे वजन 276 किलोग्रॅम होते. जपानमध्ये ओमा समुद्रकिनाऱ्यावर हा मासा पकडण्यात आला होता

आतापर्यंत टुना माशाला मिळालेली ही तिसरी विक्रमी किंमत आहे. याआधी गेल्यावर्षी सुशी रेस्टॉरंट चेनचे मालक आणि ‘टूना किंग’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कियोशी किमुरा यांनी तब्बल 21 कोटी रुपये मोजून टुना मासा खरेदी केला होता. तर 2013 मध्ये त्यांनी 15 कोटी 5 लाखांना टुना मासा खरेदी केला होता.

tuna1

टूना मासा ही एक दुर्मिळ प्रजाती असल्याने याला मोठी मागणी असते. उच्चवर्गीय टुना माशाचे चविष्ट मास खाण्यासाठी हजारोंची किंमत मोजण्यासाठीही तयार असतात. रविवारी हा मासा खरेदी केल्यानंतर ‘टूना किंग’ कियोशी किमुरा यांना हा मासा सर्वोत्तम आणि चविष्ट असल्याची प्रतिक्रिया दिली.

आपली प्रतिक्रिया द्या