रुग्णवाहिकेला ग्रीन कॉरिडॉरसाठी जनजागृती

43

सामना ऑनलाईन, मुंबई

वाहतूक खोळंबल्याने रुग्णवाहिकांना एखाद्या गंभीर रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी एखाद्या रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी मुंबईत ग्रीन कॉरिडॉर तयार करून देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका आणि राधी फाऊंडेशनच्या सहकार्याने ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी या मोहिमेअंतर्गत काही नियमदेखील सुचविण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या