पावसाळय़ात खड्डेमुक्तीसाठी महापालिकेचे ऍप, प्रत्येक प्रभागातील सहाय्यक अभियंत्याकडे तक्रार करता येणार

मुंबई महापालिकेने पावसाळय़ात रस्त्यांवर पडणारे खड्डे 24 तासांत बुजवण्यासाठी ‘एमसीजीएम 24ऑ7’ हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मोबाईल नंबर देण्यात आला असून त्याची जबाबदारी सहाय्यक अभियंत्याकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर खड्डय़ांची तक्रार करण्यासाठी 1800221293 हा टोल फ्री नंबरही देण्यात आला आहे.

मुंबईतील रस्ते यंदाच्या पावसाळय़ात खड्डेमुक्त असावेत यासाठी मुंबई महापालिकेने ‘खड्डे दाखवा आणि 24 तासांत ते खड्डेमुक्त करा’ असा उपक्रम सुरू केला आहे. महापालिकेचे हे मोबाईल अॅप मुंबईकरांना प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. अॅपमध्ये 227 प्रभागांच्या सहाय्यक अभियंत्यांचे नंबर देण्यात आले आहेत.

तक्रारींचे अपडेट मिळणार!

मोबाईल ऑप्लिकेशनद्वारे रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांचे फोटो अपलोड करावा तसेच त्यांनी केलेल्या तक्रारीचा अपडेट संबंधित तक्रारदाराला मेसेजमधून दिला जाणार आहे.