कमला मिल आग प्रकरणी ३ स्वतंत्र गुन्हे दाखल

सामना ऑनलाईन । मुंबई

कमला मिल आग प्रकरणी एमआरटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी, मोजोसचे संचालक युग पाठक आणि ड्यूक थुली तसंच वन अबोव्हचे संचालक क्रीपेश संघवी, अभिजीत मानकर आणि रघुवंशी मील पी २२ चे संचालक शैलेंद्र सिंघ यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महापालिकेने शनिवारी मुंबईत विविध ठिकाणी नव्याने पाहणी करुन अनेक हॉटेल, रेस्टॉरंट पब, बार येथील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला. याआधी कमला मिल दुर्घटनेनंतर महापालिकेने जी दक्षिण विभागातील इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे आणि साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे या पाच अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. यापैकी काही अधिका-यांची यापूर्वीच दुसऱ्या विभागात बदली झाली असून त्यांच्या कार्यकाळात कमला मिलमधील बांधकामाला परवानगी दिल्याने त्यांना या दुर्घटनेसाठी प्रथमदर्शी जबाबदार धरण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची बदली करण्यात आली आहे.

आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस

मुंबईतील कमला मिल परिसरातील अग्नितांडवानंतर पोलिसांनी तीन आरोपींविरोधात लूक आऊट नोटीस काढली आहे. आरोपी परदेशात पळून जाऊन नयेत यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशातील सर्व विमानतळांवर अलर्ट देण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत.

अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने केलेली कारवाई –

bmc-karwai

आपली प्रतिक्रिया द्या