आर्थिक वर्षअखेर पालिकेकडून 5350 कोटींचा मालमत्ता कर वसूल

पालिकेने यावर्षी मालमत्ता कर कसुलीसाठी ठेवलेल्या 6 हजार कोटींच्या उद्दिष्टापैकी 31 मार्चपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5350 कोटी रुपये वसूल केले आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी 5700 कोटी रुपयेवसूल करण्यात आले होते अशी माहिती कर निर्धारण क संकलन किभागाचे सह आयुक्त सुनील धामणे यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेली जकात बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत राहिले आहे. यामध्ये 500 चौरस फुटांखालील घरांना मालमत्ता कर माफी दिल्याने 16 लाख घर मालकांना फायदा झाला आहे. मात्र या सवलतीमुळे मुंबई महापालिकेवर वर्षाला 464 कोटींचा आर्थिक बोजा पडत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून महसूल जमा करण्यासाठी आर्थिक वर्षात टार्गेट ठेवून काम केले जात आहे. यानुसार एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत मालमत्ता कर कसुलीचा सहा हजार कोटींचे उद्दिष्ट गाठण्यात आले होते. तर 2022-23 आर्थिक वर्षात सहा हजार कोटींच्याटार्गेटपैकी 5,350 कोटींची वसुली पूर्ण झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.