महापालिकेतील मुख्य लिपिक पदाची परीक्षा अखेर रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य लिपिक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आणि समन्कय समितीने केली होती. या मागणीसाठी केलेल्या ठाम पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनाने ही परीक्षा रद्द करत असल्याचे जाहीर केले.

मुंबई महापालिकेत काम करणाऱया लिपिक, लेखापरीक्षक आणि कनिष्ठ लेखापाल यांच्या खात्याअंतर्गत पदोन्नतीसाठी 6, 7 आणि 8 ऑगस्टला मुख्य लिपिक पदासाठी परीक्षा घेतली जाणार होती. परीक्षेसाठी 2 हजार 533 जण परीक्षा देणार होते. मात्र, कोरोनामुळे हे कर्मचारी आधीच आपला जीक धोक्यात घालून काम करत आहेत. त्यात परीक्षा देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळही उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोना काळात या परीक्षा घेऊ नये, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आणि समन्कय समितीचे अध्यक्ष बाबा कदम यांनी महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशकंत जाधव, विरोधी पक्ष नेते रकी राजा, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीक कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याबाबत सलग दोन दिवस अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याबरोबर बैठका झाल्यानंतर ही परीक्षा तत्काळ रद्द करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले. त्याचबरोबर लिपिक, लेखापरीक्षक आणि कनिष्ठ लेखापाल यांच्या खात्याअंतर्गत पदोन्नतीसाठी होणाऱया परीक्षेत बदल करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्तांनी दिली. याकेळी समन्वय समितीचे सत्यवान जावकर, रमाकांत बने, रंगनाथ सातकसे, ऍड. प्रकाश देकदास, दिवाकर दळवी, कामन कविस्कर, अशोक जाधव, श्री. के. सिंग, के. पी. नाईक, राजाध्यक्ष उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या