पालिकेच्या ताफ्यात आणखी 75 रुग्णवाहिका, शहर तसेच पूर्व-पश्चिम उपनगरासाठी प्रत्येकी 25

320

कोरोनाबाधित रुग्णांना ने-आण करण्यासाठी पालिका आणखी 75 रुग्णवाहिका घेणार आहे. यामध्ये मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी प्रत्येकी 25 रुग्णवाहिका घेतल्या जाणार आहेत. यामुळे पालिकेच्या रुग्णवाहिकांची संख्या सुमारे 600 होणार आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार प्रत्येक वॉर्डमध्ये ‘वॉर रूम’ सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी संपर्क केल्यावर कोरोनाबाधित, संशयित रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन आणि संबंधित विभागातील रुग्णालयांबाबत माहिती देऊन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यामध्ये रुग्णांची ने-आण करण्यासाठी ऍम्ब्युलन्सची संख्या वाढवण्यात येत आहे. दरम्यान, ज्या व्यक्तींना रुग्णवाहीकेची गरज आहे, त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील 1916 या नंबरवर फोन करुन 2 असा पर्याय निवडल्यास त्या नातेवाइकास संपर्क करत पालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल. शिवाय प्रत्येक वॉर्डसाठी दिलेल्या वॉर रूममधील क्रमांकावर संपर्क केल्यानंतरही ऍम्ब्युलन्स उपलब्ध होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या