महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये सीसीटीव्हीची नजर; मारहाण, मूल चोरी रोखणे, सुरक्षेसाठी निर्णय

407

पालिकेच्या 9 प्रसूतिगृहांमध्ये 216 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यासाठी पालिका 3 कोटी 1 लाख 17 हजार रुपये खर्च करणार आहे. डॉक्टर-कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण, मूलचोरी, मुलांच्या अदलाबदलीच्या घटनांना आळा घालणे, डॉक्टरांना होणारी मारहाण आणि सुरक्षिततेसाठीच पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

पालिका रुग्णालयांत रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांना मारहाण, धक्काबुक्की करण्याचे प्रकार घडले आहेत, तर काही वेळा प्रसूतिगृहांतून मुलांची चोरी होण्याचे प्रकारही घडले आहेत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी पालिका रुग्णालये, प्रसूतिगृह या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीक्ही कॅमेरे लावण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.

या रुग्णालयांत लावणार सीसीटीव्ही
विक्रोळी पूर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतिगृह, अंधेरी पूर्व येथील मरोळ प्रसूतिगृह, घाटकोपर पश्चिम येथील मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृह, जोगेश्वरी पूर्व येथील स्काटॅस कॉलनी म्युनिसिपल प्रसूतिगृह, वांद्रे पश्चिम येथील बी. जी. खेर प्रसूतिगृह, कांदिवली पश्चिम येथील चारकोप प्रसूतिगृह, मालाड पश्चिम येथील चोक्सी प्रसूतिगृह, मालाड पश्चिम येथील मालकणी प्रसूतिगृह व बोरिवली पूर्व येथील कस्तुरबा प्रसूतिगृह या 9 प्रसूतिगृहांत सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या