मुंबईत 30 लाख मुलांच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज! 350 व्हॅक्सिनेशन सेंटर, 1500 आरोग्य कर्मचाऱयांना ट्रेंनिंग

मुंबईत 2 ते 18 वर्षे वयोगटातील 30 लाख मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेने आराखडा तयार केला आहे. यामध्ये पालिकेची मोठी हॉस्पिटल, उपनगरीय रुग्णालये, नर्सिंग होम आणि कोविड सेंटरमध्ये सुरू केलेल्या पेंद्रांवर लसीकरण व्हॅक्सिनेशन केले जाणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी पेंद्राने निर्देश दिल्यानंतर 2 ते 3 दिवसांत 1500 आरोग्य कर्मचाऱयांना ट्रेनिंग देऊन लसीकरण सुरू करण्यात येईल. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 13 ऑक्टोबरपर्यंत 18 वर्षांवरील पात्र 90 लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत एकूण 1 कोटी 33 लाख 13 हजार 138 डोस देण्यात आले आहेत. यात 85 लाख 60 हजार 415 जणांनी पहिला तर 47 लाख 52 हजार 723 जणांनी दुसरा डोस घेतल्याने त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया’ने मंगळवारीच लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरला परवानगी दिली. मात्र केंद्रीय मंत्रालयाने यावर अजून काम बाकी असल्याचे सांगत तूर्तास तातडीने अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे. असे असले तरी कोणत्याही क्षणी केंद्राची परवानगी मिळण्याची शक्यता असल्याने पालिकेने मुलांच्या लसीकरणासाठी प्लॅनिंग सुरू केले आहे.

कोल्ड स्टोरेज सेंटरची पूर्ण क्षमता

  • पालिकेने कांजूरमार्ग येथे सुरू केलेल्या सेंट्रल कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये एक कोटी डोस साठवून ठेवण्याची क्षमता आहे. शिवाय एफ/दक्षिण विभाग कार्यालयाच्या ठिकाणीही व्यवस्था आहे. त्यामुळे लसीकरण सुरू झाल्यास डोस साठवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
  • मोठय़ा आणि उपनगरीय रुग्णालयांसह नर्सिंग होम, कोविड सेंटरमधील पेडियाट्रिक वॉर्डमध्ये लसीकरण करता येईल. मुलांची रुग्णालये, खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची परवानगी देण्यात येईल.