तानसा धरणाखाली मुंबई महापालिकेचीवीजनिर्मिती, १८ लाखांची बचत

64

>>नरेश जाधव, खर्डी

प्रगती आणि विकासाचे नवे पर्व गाठणाऱया मुंबई महापालिकेने आता वीजनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. तानसा धरणाखाली मुंबई महापालिकेने वीजनिर्मितीचा प्रकल्प तयार केला असून तो पूर्णही झाला आहे. या प्रकल्पातून तानसा धरणासाठी गरज असलेली ४० किलोवॅट वीज लवकरच तयार केली जाणार असून त्यातून १८ लाख रुपयांची वीज बिल बचत होणार आहे. विशेष म्हणजे, या वीजनिर्मितीमध्ये पाण्याचा एक थेंबही वाया जाणार नसून असा प्रकल्प साकारणारी मुंबई महानगरपालिका ही देशात पहिली ठरणार आहे.

शिवसेनेने दिलेल्या वचननाम्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरण क्षेत्रात वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे नमूद केले होते. त्यासाठी २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात ५० लाखांहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रमेश मालवीय आणि त्यांच्या सहकाऱयांनी केलेल्या या प्रकल्पाच्या ब्ल्यू प्रिंटची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केल्यानंतर महापालिका जोरात कामाला लागली. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, निधी मंजूर झाला आणि तानसा जल विभागाचे सहाय्यक अभियंता पी. बी. चित्रवंशी यांच्यासह वीजनिर्मिती प्रकल्पाची टीम कामाला लागली. मुंबईला होणारा पाणीपुरवठा खंडित न करता या वीजनिर्मिती प्रकल्पाची पाइपफिटिंग स्थानिक कर्मचाऱयांनी चित्रवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केली. अवघ्या वर्षभरात तानसा धरण क्षेत्राखाली हा वीजनिर्मिती प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पाचे लवकरच लोकार्पण केले जाईल, असेही ते म्हणाले.

एक थेंबही पाणी वाया जाणार नाही

तानसा धरणातून वीजनिर्मिती केंद्रात सोडण्यात येणारे पाणी पुन्हा धरणात वळविण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा एक थेंबही वाया न जाता त्याचा धरणात पुनर्वापर होणार आहे. महावितरणकडून पुरवठा होणाऱ्या विजेत वारंवार अडथळे येतात ते या वीजनिर्मिती प्रकल्पामुळे दूर होणार आहे.

यासाठी वापरली जाणार वीज

तानसा धरण बांधावरील वीज दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे व पाणीपातळीवर आधारित दरवाजे, पालिकेचे स्थानिक कार्यालय, कर्मचाऱयांची निवासस्थाने तसेच पथदिवे यासाठी दरवर्षी ३० किलो वॅट वीज खर्ची पडते. त्यासाठी मुंबई महापालिका १८ लाख रुपये महावितरणला चुकते करते. तानसाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ४० किलो वॅट इतकी वीज निर्माण होणार आहे. त्यातून ३० किलो वॅट विजेतून तानसाची गरज भागविली जाईल. त्यामुळे महापालिकेच्या १८ लाख रुपयांची बचत होईल.

आली होती. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रमेश मालवीय आणि त्यांच्या सहकाऱयांनी केलेल्या या प्रकल्पाच्या ब्ल्यू प्रिंटची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केल्यानंतर महापालिका जोरात कामाला लागली. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, निधी मंजूर झाला आणि तानसा जल विभागाचे सहाय्यक अभियंता पी. बी. चित्रवंशी यांच्यासह वीजनिर्मिती प्रकल्पाची टीम कामाला लागली. मुंबईला होणारा पाणीपुरवठा खंडित न करता या वीजनिर्मिती प्रकल्पाची पाइपफिटिंग स्थानिक कर्मचाऱयांनी चित्रवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केली. अवघ्या वर्षभरात तानसा धरण क्षेत्राखाली हा वीजनिर्मिती प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पाचे लवकरच लोकार्पण केले जाईल, असेही ते म्हणाले.

यासाठी वापरली जाणार वीज

तानसा धरण बांधावरील वीज दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे व पाणीपातळीवर आधारित दरवाजे, पालिकेचे स्थानिक कार्यालय, कर्मचाऱयांची निवासस्थाने तसेच पथदिवे यासाठी दरवर्षी ३० किलो वॅट वीज खर्ची पडते. त्यासाठी मुंबई महापालिका १८ लाख रुपये महावितरणला चुकते करते. तानसाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ४० किलो वॅट इतकी वीज निर्माण होणार आहे. त्यातून ३० किलो वॅट विजेतून तानसाची गरज भागविली जाईल. त्यामुळे महापालिकेच्या १८ लाख रुपयांची बचत होईल.
एक थेंबही पाणी वाया जाणार नाही

तानसा धरणातून वीजनिर्मिती केंद्रात सोडण्यात येणारे पाणी पुन्हा धरणात वळविण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा एक थेंबही वाया न जाता त्याचा धरणात पुनर्वापर होणार आहे. महावितरणकडून पुरवठा होणाऱ्या विजेत वारंवार अडथळे येतात ते या वीजनिर्मिती प्रकल्पामुळे दूर होणार आहे.

परिसरातील आदिवासी पाडे उजळणार

४० किलोवॅटमधून ३० किलोवॅट वीज धरणक्षेत्रासाठी वापरल्यानंतर उरलेल्या १० किलोवॅट विजेतून धरणक्षेत्र परिसरातील पाडे विजेने उजळण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कार्यकारी अभियंता रमेश मालवीय यांनी सांगितले.

…तर बाळासाहेब ठाकरे जलाशय आणि मोडकसागरमधूनही वीज निर्माण होईल

तानसा धरणाखाली उभे राहत असलेले हे वीजनिर्मिती केंद्र प्रायोगिक तत्त्वावर आहे. त्याची व्याप्ती वाढली तर या वीजनिर्मिती केंद्रात जवळच असलेल्या मध्य वैतरणा अर्थात बाळासाहेब ठाकरे जलाशय आणि मोडकसागर या धरणातील पाण्यातूनही वीजनिर्मिती केली जाऊ शकते असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या