ग्राहकांना ‘गंडलेल्या’ व्यवहाराचे पैसे वेळेत परत न दिल्यास बँकांना दंड होणार

486

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ग्राहकांच्या अयशस्वी होणाऱ्या व्यवहाराच्या तक्रारी लक्षात घेऊन टर्नअराऊंड टाइम (टीएटी) निश्चित केला आहे.  याअंतर्गत, एखाद्या ग्राहकाचा व्यवहार अयशस्वी झाल्यास बँका एका ठराविक मुदतीत तोडगा काढावा आणि ही रक्कम  ग्राहकाला ताबडतोब परत करावीत असे आदेश रिझर्व्ह बँकेने जारी केले आहेत.  असे न झाल्यास बँकांना ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी लागेल असं आदेशात म्हटले आहे.

आरबीआयने म्हटले आहे की, बँकांनी ग्राहकांच्या तक्रारी किंवा भरपाईच्या दाव्याची वाट न पाहता भरपाई द्यावी. ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी केंद्रीय बँकेने एप्रिलमध्ये सर्वप्रथम टीएटीची घोषणा केली होती. ग्राहकांच्या तक्रारीनंतरही पैसे परत मिळण्यास वेळ लागत असल्याचे आरबीआयच्या लक्षात आले आहे. आरबीआयने बँकेच्या व्यवहारांना आठ वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागले आहे. ए.टी.एम व्यवहार, कार्ड व्यवहार, त्वरित पेमेंट सिस्टम, युनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि प्रीपेड कार्ड अशी व्यवहारांची विभागणी केली आहे.

एकदा व्यवहार अयशस्वी झल्यास बँकांना पाच दिवसात ग्राहकांच्या खात्यावर पैसे परत करावे लागतात. मात्र बँका ते पैसे वेळेत परत करत नाही. असा मुजोर बँकांना रिझर्व्ह बँकेने दणका दिला असून बँकेने परताव्यासाठी निश्चित कालावधीपेक्षा जास्त वेळ घेतल्यास ग्राहकाला दररोज 100 रुपये या दराने नुकसानभरपाई द्यावी लागेल असं आदेशात म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की जर ग्राहकांचे टीएटीद्वारे समाधान झाले नाही तर ते बँकिंग लोकपालांकडे तक्रार करू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या