अंत्यविधीसाठी जाताना वैनगंगा नदीत नाव उलटली, दोघांचा मृत्यू

913

अंत्यविधीसाठी जात असताना नाव उलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही दुर्घटना सावली तालुक्यात काढोली येथील वैनगंगा नदी घाटावर घडली.

chandrapur-1

मिळालेल्या माहितीनुसार, सावली तालुक्यात काढोली येथील लोक वैनगंगा नदी घाटावर नावेने जात होते. याच दरम्यान नाव पलटी झाली. या दुर्घटनेत दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर सहा जणांना वाचवण्यात आले. गडचिरोली आणि चंद्रपूर येथून बचाव पथक रवाना करण्यात आले असून, बुडालेल्या दोन व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या