दुहेरीत 16 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या जुळ्या ‘ब्रायन’ बंधुंची निवृत्तीची घोषणा

849

टेनिसमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या ब्रायन बंधुंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. अमेरिकेचे हे दोन्ही खेळाडू पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिसला रामराम ठोकणार आहे. या दोघांच्या निवृत्तीनंतर टेनिसचा एक ‘गोल्डन इरा’ संपुष्टात येईल.

टेनिसमध्ये दुहेरीत खेळताना ब्रायन बंधू यांनी अनेक विक्रम नोंदवले. इतिहास ब्रायन बंधुं जोडीला सर्वेश्रेष्ठ दुहेरी खेळाडू म्हणून आठवणीत ठेवेल. 41 वर्षीय या जुळ्या भावांनी संयुक्तपणे सांगितले की, पुढील वर्षी अमेरिकन ओपनमध्ये सहभागी झाल्यानंतर टेनिसमधून संन्यास घेण्यात येईल. विशेष म्हणजे या दोघांनी 1995 ला अमेरिकन ओपनद्वारेच आपल्या ग्रँडस्लॅम कारकीर्दीची सुरुवात केली होती.

ब्रायन बंधुंनी नेहमीच आपल्या आक्रामक शैलीन टेनिसप्रेमींना वेड लावले. या दोघांनी आतापर्यंत 16 ग्रँडस्लॅम पदकांची लयलूट केली आहे. यासह 118 स्पर्धांवरही विजयी मोहोर उमटवली आहे. 2012 ला झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये दोघांनी आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते.

निवृत्तीची घोषणा करताना बॉब ब्रायन म्हणाला, आम्ही आता आराम करण्याचे निश्चित केले आहे. हा एक शानदार प्रवास होता. आम्ही तंदुरुस्त असतानाच या प्रवाशाचा शेवट करू इच्छितो. आम्ही अजूनही चषक जिंकण्यासाठी खेळू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या