बॉडीबिल्डरने ‘बाहुली’शी केलं लग्न, पाहा व्हिडीओ…

कझाकिस्तानमध्ये युरी टोलोशको नावाचा एक बॉडीबिल्डरने ‘बाहुली’शी लग्न केलं आहे. इतकंच काय तर युरीने वर्षभरापूर्वी या बाहुलीला प्रपोज ही केलं होतं. या बॉडीबिल्डरने बाहुलीसोबतचा आपला लग्नाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

युरोने या बाहुलीशी मार्च महिन्यात लग्न करण्याचं ठरवलं होतं. मात्र कोरोना संकटामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे त्याला लग्न करता आलं नाही. युरोच्या या बाहुलीचे नाव ‘मार्गो’ आहे. युरो मार्गोसोबत ऑक्टोबरमध्ये लग्न करणार होता. मात्र युरो एका ट्रान्सजेंडर रॅलीमध्ये असताना त्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला. ज्यात तो खूप जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता तो बरा झाला असून त्यांनी मार्गोशी लग्न ही केलं आहे. आपल्या लग्नाचा व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या