बोफोर्सचं भूत पुन्हा बाहेर येणार

38

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात झालेल्या बोफोर्स घोटाळा प्रकरणावर लवकरच सुनावणी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सर्वौच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या ६४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४३७ कोटी रुपयांच्या होवित्जर तोफांच्या खरेदी प्रकरणातील आर्थिक देवाण-घेवाणीच्या वेळी बोफोर्सचे प्रकरण पुन्हा बाहेर येण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना भाजप नेते आणि वकील अजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, बोफोर्स घोटाळा प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यात यावी असा अर्ज याच महिन्यात दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यावर सुनावणी झालेली नाही. अग्रवाल यांनी बोफोर्स घोटाळा प्रकरणी हिंदूजा बंधुंना आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात अपील केली होती. मात्र याप्रकरणी लवकारात लवकर सुनावणी करण्यासाठी आवेदन दाखल करण्याचा विचार अग्रवाल करत आहेत.

१९८७ मध्ये ‘बोफोर्स’ प्रकरण उघडकीस आले होते. राजीव गांधींच्या काळात बोफोर्स तोफांच्या आवाजांनी देश दणाणला होता. राजीव गांधी यांचेच सहकारी आणि माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बोफोर्स तोफा खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. बोफोर्सच्या व्यवहारात ६४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या