बनावट पदव्यांच्या आधारे परदेशवाऱ्या

उच्च शिक्षणासाठी न्यूयॉर्कला जाण्यासाठी अमेरिकन दूतावासाला बनावट पदव्या सादर करून फसवणूक करणाऱ्या साई व्यंकटा दुर्गाप्रसाद कोळी याला बीकेसी पोलिसांनी अटक केली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

साई मूळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे. मित्राच्या मदतीने त्याने अमेरिकेतील एक प्रसिद्ध कॉलेज शोधले. त्या कॉलेजमध्ये मास्टर इन इन्फॉर्मेशन सायन्स हा विषय घेतला. तसेच त्याने कॉलेजची फीदेखील भरली होती. फी भरल्यानंतर त्याने बनावट पदव्या त्या कॉलेजला सादरदेखील केल्या. गेल्या आठवडय़ात साई हा अमेरिकन दूतावासात मुलाखतीसाठी गेला होता. दूतावासातील अधिकाऱ्याने त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा त्यांना साईच्या पदव्या खोटय़ा असल्याचे समजले.