कळवा-खारेगावात बोगस मुस्लिम मतदारांची घुसखोरी

47
प्रतिकात्मक फोटो

सामना ऑनलाईन,ठाणे

शंभर टक्के हिंदू वस्ती असलेल्या कळवा-खारेगांव प्रभागात शेकडो बोगस मुस्लिम मतदारांची नावे घुसडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर बैठया चाळींना तीन ते चार मजली इमारती दाखवून मतदार यादी फुगवण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी व मतदारांचे सर्व्हेक्षण करणाऱयांच्या कारभारावर संशय व्यक्त होत असून मुस्लिम बहुल प्रभांगांमध्ये अशा हजारो बोगस मतदारांचा भरणा झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कळवा येथील प्रभाग क्रमांक ९ मध्ये पारसिकनगर, संघवी हिल्स, आनंद विहार, सह्याद्री, खारीगांव इत्यादी परिसर येतो. यातील खारेगाव ही भुमीपुत्रांची वस्ती म्हणून ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांमध्ये येथे नवीन बांधकामे झाली असली तरी अजूनही या परिसरात शंभर टक्के हिंदू वस्ती आहे. मात्र ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये एक दोन नव्हे तर शेकडो मुस्तलीम नावे दिसत असल्यामुळे रहिवाशंमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील सहयोग अपार्टमेंटमध्ये २४२ मुस्लिम मतदार दाखवण्यात आले असल्याचे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका व सभागृह नेत्या अनीता गौरी यांनी निदर्शनास आणले आहे.   या अपार्टमेंटमध्ये एकही मुस्लिम कुंटुंब राहत नसल्याने ही बाब तत्काळ निदर्शनास आली आहे. मात्र मतदार यादीतील इतर नावे व पत्त्यांवर नजर फिरवली असता अनेक झोल झाले असल्याचे निदर्शसनास येते. येथील अनेक बैठया चाळी या एक मजली आहेत. मात्र मतदारयादीमध्ये या बैठया चाळी तीन ते चार मजली इमारती दाखवण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आपल्या घरावर इमले कधी चढले व त्यामध्ये मुस्लीम कुटुंबे कधी रहायला आले याचा शोध खारेगांववासीय घेत आहेत.

 वाद जुनाच

खारेगावमध्ये बोगस मुस्लिम मतदार घुसवण्याचा हा पहिला प्रकार नाही. २०१२ च्या पालिका निवडणुकीतही मतदार यादीचा घोळ उघडकीस आला होता. मतदार यादीतून ही नावे वगळण्यात यावी यासाठी पाच क्रमांकाचा फॉर्म भरुन निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी ही नावे वगळण्यात आली. त्यामुळे आता पालिका निवडणुकीत झोल होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच पुरवणी  मतदार यादीमध्ये पुन्हा तीच नावे घुसडण्यात आली आहेत.

 बोगस मतदारांचा भांडा फोडणारच

निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन राष्ट्रवादीचे  लोकप्रतिनिधी बोगस मतदारांचा आकडा फुगवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अनिता गौरी यांनी केला आहे. पुरवणी यादीतील नावे वगळता येणार नाही हे आधीच निवडणूक विभागाने जाहिर केले आहे. त्यामुळे हरकती सुचना केल्यानंतरही नावे वगळण्यात येतील याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता आम्हीच या बोगस मतदारांवर नजर ठेवणार असून मतदानाच्या दिवशी त्यांचा भंडाफोड करु असा इशारा अनिता गौरी यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या