पोलिसाच्या अंगावर फेकला उकळता चहा, महिलांनी केली दगडफेक

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सध्या सरकारने सर्वत्र रात्री 8 नंतर संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या सूचनेला विरोध करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याकरिता गेलेल्या पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मध्य प्रदेशातील काजी कँप परिसरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शनिवारी रात्री संचारबंदी लागू करण्यात आली होती. पोलीस रस्त्यावर गस्त घालून फिरत होते. त्यावेळी संचारबंदी असूनही या परिसरातील एका हॉटेल मालकाने त्याचे हॉटेल सुरू ठेवले होते.

याबाबत कारवाई करण्याकरिता गेलेल्या पोलिसाच्या अंगावर उपहागृहाचा मालक आणि त्याच्या मुलाने उकळता चहा फेकला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर उपहारगृहाचा मालक आणि त्याच्या कुटुंबीयांनी कारवाईकरिता गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यासही सुरुवात केली. यामुळे तीन पोलीस जखमी झाले.

या घटनेबाबत हनुमानगंज येथील पोलीस अधिकारी महेंद्र सिंह ठाकूर यांनी माहिती दिली की, संचारबंदीच्या वेळी मालक जहीर खान याने त्याचे अल मदिना हे हॉटेल सुरू ठेवले होते. तो ग्राहकांना चहा बनवून देत होता. त्यावेळी हॉटेल बंद करण्याची कारवाई करण्याची गेलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद जाट यांना शिव्या देऊन त्यांच्या अंगावर उकळता चहा टाकण्यात आला.

तेथे जमा झालेल्या ग्राहकांनीही पोलिसांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली आणि पोलिसांना हॉटेलमधून बाहेर काढून शटर बंद केले. तसेच मालक जहिरच्या कुटुंबातील महिलांनीही पोलिसांवर दगडफेक केली. या प्रकरणाचा पोलीस शोध घेत असून पुढील कारवाई सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या