बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची चुरस 9 ते 11 जानेवारीला प्राथमिक फेरी; अंतिम फेरी शिवाजी मंदिरला रंगणार

मराठी नाटय़ वर्तुळामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱया सुप्रिया प्रॉडक्शन्स आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’ची अंतिम फेरी 18 जानेवारीला दादरच्या शिवाजी मंदिर नाटय़गृहामध्ये रंगणार आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या 9 ते 11 जानेवारी या कालावधीत नेहरू नगर, कुर्ला येथील प्रबोधन प्रयोग घर येथे होणार आहे. स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी आहे. प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला प्रसिद्ध नाटय़ निर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्तरूप दिले आणि 2016पासून ही स्पर्धा सुरू झाली. गेल्या पाच वर्षांमध्ये  अनेक बोलींमधून 200 हून अधिक संघ तर 5 हजारांहून अधिक कलावंत या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.   प्रथम चार सांघिक विजेत्यांसाठी अनुक्रमे 25 हजार, 20 हजार, 15 हजार व 5 हजार अशी पारितोषिके आहेत. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्काराने गौरवण्यात येणार असून हे पारितोषिक ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व त्यांचे बंधू सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे. प्रवेश अर्जासाठी  www.supedriyedapedroducedtion.comed या वेबसाईटवर किंवा 8108040393 या क्रमांकावर संपर्क साधा.