Photo story – चित्रपटनगरीला लागले ‘ग्रहण’, 2020 मध्ये ‘या’ सेलेब्रिटिंनी घेतला निरोप

1213

कोरोनामुळे जगाच्या दृष्टीने 2020 हे वर्ष जसे तापदायक ठरत आहेत तसेच बॉलिवूडसाठी देखील दुःखद ठरत आहे. 2020 या वर्षात पहिल्या काही महिन्यात अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. काहींनी आजारापुढे हात टेकले, तर काहींनी आत्महत्या करत जीवन संपवले. या सर्वांच्याच जाण्याने चित्रपटनगरीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. पाहुयात कोण आहेत हे कलाकार…

1. इरफान खान

irfan-return
दीर्घकाळ कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देणाऱ्या इरफान खान याने याच वर्षी जगाचा निरोप घेतला. 29 एप्रिल रोजी इरफान काळाच्या पडद्याआड गेला. इरफानचे जाणे चाहत्यांच्या मनात पोकळी निर्माण करून गेले. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाबाबत आणि व्यक्तीमत्वाबाबत लोकांनी भरभरून लिहिले.

2. ऋषी कपूर

rishi
कपूर फॅमिलीने बॉलिवूडवर अक्षरशः राज्य केले. यापैकी एक म्हणजे ऋषी कपूर. गुबगुबीत चेहरा आणि मोठ्या डोळ्याच्या ऋषी कपूर यांनी 70 ते 90 च्या दशकात तरुणींना वेड लावले. 30 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले आणि दीर्घकाळासाठी कॅन्सरशी सुरू असलेली झुंज संपली.

3. वाजिद खान

wajid-khan
साजिद-वाजिद या संगीतकार जोडीतील एक वाजिद खान यांनी या वर्षी जगाचा निरोप घेतला. 1 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि ही जोडी कायमची फुटली.

4. सुशांत सिंह राजपूत

sushant-singh-rajput
प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जूनला आत्महत्या केल्याचे समोर आले आणि बॉलिवूडवर आभाळ कोसळले..मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, नेपोटीझम, भेदभाव चव्हाट्यावर आला. सोशल मीडियावर यावरून अनेक दिग्गज कलाकार, निर्माते यांना टार्गेट करण्यात आले.

5. सरोज खान

saroj-khan-1
बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शिका सरोज खान यांचा 3 जुलै रोजी कार्डियक अरेस्टमुळे मुंबईमध्ये मृत्यू झाला. अनेक अभिनेत्रींना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी त्यांचा प्रमुख हात होता. माधुरी दीक्षितसह अनेक अभिनेत्री, अभिनेते यांनी यांच्याबाबत भरभरून लिहिले.

6. जगदीप जाफरी

img-20200708-wa0020
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि कॉमेडियन जगदीप जाफरी यांचे 8 जुलै रोजी मुंबईत निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. शोलेमधील ‘सुरमा भोपाली’ या भूमिकेमुळे ते विशेष प्रसिद्धीस आले. त्यांनी जवळपास 400 चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

7. सुशील गौडा

images
कन्नड अभिनेता सुशील गौडा याने 8 जुलै रोजी आत्महत्या केली. त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होता, मात्र तत्पुर्वी वयाच्या 30 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या