
कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला असून संपूर्ण जग ठप्प झाले आहे. यामुळे हजारो लोकांचा जीव गेला असून लोकांना घरात बसून राहावे लागत आहे. जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन असून लोकांना मजबुरीने घरात बसावे लागते आहे. हिंदुस्थानमध्येही 21 दिवसांचा लॉकडाऊन असून यामुळे लोक घरात बंदिस्त झाले आहे. याच दरम्यान लॉकडाऊन मध्ये डिप्रेशन पासून वाचण्यासाठी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी एक आयडिया दिली. मात्र यामुळे ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.
राज्य सरकारने दारूच्या सर्व दुकाना उघडायला हव्या, असे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे. सरकारला सायंकाळच्या सुमारास दारूच्या दुकान उघडायला हव्या. मला चुकीचे समजू नका. परंतु लोकं घरात बसून ताणतणावाल जगण्यास मजबूर आहे. डॉक्टर-पोलीस यांना देखील ताणतणावातून मुक्ती हवी आहे. तसेही सध्या काळ्या बाजारात विक्री सुरू आहे, असे ट्विट त्यांनी केले.
तसेच ऋषी कपूर यांनी सरकारला आवाहन केले आहे की सध्या दारूला कायदेशीर करण्यात यावे. त्यांच्या मते सध्या सरकारला अबकारी कराच्या रूपाने मिळणाऱ्या पैशांची सध्या गरज आहे. त्यामुळे दारूची दुकाने उघडी ठेवावी अशी मागणी त्यांनी केली. आता यावर सरकार काय निर्णय घ्यायचा तो घेईल परंतु नेट कऱ्यांनी ऋषी कपूर यांना ट्रोल केले आहे. ताणतणावात असताना दारू पिणे जास्त खतरनाक होऊ सगकते असे एका युझर्सने म्हंटले आहे. तर काहींनी असे केल्यास लोक आक्रमक होतील आणि दुकानाबाहेर मोठी रांग लावतील, तसेच यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडेल असेही नेटकऱ्यांनी म्हंटले आहे.